Breaking News

गोमांस विक्री करणारास अटक


कोपरगाव / श. प्रतिनिधी 
शहरातील हनुमाननगर इंदिरानगर या भागात गुरुवारी दु.12.35 च्या सुमारास काळ्या रंगाच्या हिरोहोंडा पॅशन मोटरसायकल क्र. एमएच 17 एपी 8648 वरून मुक्तार निसार कुरेशी वय 38 रा. संजयनगर कोपरगाव हा गोवंशमांस विक्री करण्याच्या इराद्याने आपल्याजवळील काळ्या रंगाच्या स्कूलबॅगमध्ये 1800 रुपये किंमतीचे पंधरा किलो वजन असलेलेे गोमांस आणि तीस हजार रुपये किमतीची हिरोहोंडा पॅशन मोटारसायकल सह ताब्यात घेण्यात आला. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.