Breaking News

लिंबोळी गोळा करून बर्डे कुटुंब करतात उदरनिर्वाह


बाळासाहेब नवगिरे, पानेगाव - लिंबाच्या झाडाच्या परिपक्व झालेल्या लिंबोळी गोळा करून लोहगाव (ता.नेवासा) येथील दाम्पत्य शिवाजी बर्डे तसेच त्यांची पत्नी आशाबाई लिंबाच्या झाडाच्या जुनच्या शेवटच्या तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लिंबोळी गोळा करून त्याच्यातुन रोजगार उपलब्ध करत आहे. विशेष म्हणजे यातुन एक प्रकारे खुप मोठी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सेवा घडत असल्याचे दिसून येते. लिंबोळी पासुनच विविध प्रकारचे सेंद्रिय खत तयार होते. त्याचबरोबर आर्क तयार करून पिकासाठी फवारणी म्हणून वापर ही केला जातो . विशेष म्हणजे परिपक्व झालेल्या बियांपासून लिंबाची रोपे सुध्दा तयार करण्यासाठी वन विभागा कडुन मागणी असते. बर्डे यांनी सांगितले की सध्या लिंबाचे मोठ मोठी झाडे कमी झाली असुन सर्व साधारणपणे सिझन मध्ये पंचवीसच्या वर गाववाड्या, वस्त्या, रानोमाळ फिरून दिवसाला 120 किलोच्या वर लिंबोळी गोळा केल्या जातात. त्याचबरोबर सर्व साधारणपणे 7 ते 8 रुपये किलो दराने गावातील दुकानदार स्वच्छ निवड करून विकत घेत असतात . मोटारसायकल पेट्रोल इतर खर्च निघुन दोघांना चांगल्या प्रकारे रोजगार यामधून मिळत असल्याचे यावेळी सांगितले.


एकीकडे रोजगार नसल्याचे कारण सांगून काही कुटुंब काम करण्यासाठी आळशीपणा दाखवतात .परंतु 20 ते 25 किमी फिरून बर्डे कुटुंब लिंबोळी गोळा करून एक मोठा आदर्श आजच्या स्पर्धेच्या युगात दाखवून दिला आहे - दत्तात्रय घोलप. पानेगाव

लिंबाचे झाड हे मोठे गुणकारी असुन भविष्यात या झाडांचे प्रमाण वाढविण्यासाठी वन विभागाने एक व्यापक मोहीम राबविण्यात यावी. संजय जंगले. सरपंच.