Breaking News

‘ डॉक्टर डे ‘ निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद


श्रीरामपूर (प्रतिनिधी )- डॉक्टर डे निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 52 रक्तदात्यांंनी रक्तदान केले. या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले. पालिकेच्या आगाशे सभागृहात आयोजित रोटरी क्लब, तालुका मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन , नित्यसेवा ब्लड बँक व जैन डॉक्टर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर डे निमित्ताने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन 81 वेळेस रक्तदान करणारे रोटरीयन संदिप शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी कामगार नेते अविनाश आपटे, गणेश देशपांडे, डॉ. राजाराम जोंधळे, डॉ. रविंद्र जगधने, डॉ. संजय अनारसे, डॉ. सतिष भट्ट, डॉ. प्रशांत गंगवाल, विशाल कोटक, डॉ.ओम जोंधळे, योगिता कोटक, डॉ.सुचिता भट्टड, वृंदा देशपांडे, डॉ.रविंद्र कुटे, डॉ. सतिष कोठारी, डॉ. नवनीत जोशी आदि उपस्थित होते.
तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय अनारसे म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनीच रक्तदान केलेच पाहिजे. रक्तदानाचे बाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत. ते दूर करुन त्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. डॉ. राजाराम जोंधळे म्हणाले की, कोणतीही अपेक्षा न बाळगता रक्तदान करणे गरजेचे आहे. यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा. आपण त्यांना सर्वतोपरी सहकार्य करु, असे ते म्हणाले.
81 वेळा रक्तदान करणारे संदिप शहा म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे समजूनच मी रक्तदान करत आहे. रक्तदान केल्याने त्याचा एखाद्या रुग्णांस लाभ होतो. याचे समाधान आपल्याला मिळते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळा रक्तदान करुन रुग्णांना जीवदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
यावेळी कृषी दिनानिमित्ताने शेतकरी संघटनेचे धनंजय धोर्डे, लेहलडाख येथे मोटारसायकलवर गेलेले डॉ.मुकुद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सतिष भट्टड यांनी केले. तर आभार रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश देशपांडे यांनी मानले. यावेळी डॉ. एन. जी. चौधरी, डॉ. कुमार चोथाणी, डॉ.वसंतराव जमदाडे, गंगानाथ देशपांडे, सुरेश बनकर, पुरुषोत्तम मुळे, विशाल फोपळे, डॉ. सुरज थोरात, राजेश कुंदे, विनोद पाटणी, अनिल पांडे, निलेश नागले, चंदर चुग, प्रेम नारा, डॉ. पडघन, डॉ. भरत गिडवाणी, डॉ. अजित देशपांडे, हरसुख पदमाणी, विकी कथुरिया, सतनाम चुग, डॉ.अतुल करवा, डॉ.मनोज संचेती, पत्रकार मनोज आगे आदि उपस्थित होते.