Breaking News

लोकनेते मारुतराव घुले पाटील पुण्यस्मरणा निमित्त भेंड्यात कार्यक्रम


भेंडा(वार्ताहर )  
येथील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे 16 वे पुण्य स्मरणानिमित्त रविवार दि.8 जुलै 2018 रोजी सकाळी 9:30 वाजता भेंडा येथे केसरी पांडुरंग महाराज गिरीवावीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अ‍ॅड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे व संचालक मंडळाचे प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी केले आहे.