Breaking News

श्रीरामपूर येथे शवपेटी शहरवासियांसाठीचे लोकार्पण


श्रीरामपूर (प्रतिनिधी )
प्रेमप्रकाश आश्रमाचे जयपूरचे संतश्री लक्ष्मणदास चेन्नईवाले यांच्या हस्ते शवपेटी शहरवासियांसाठी लोकार्पण सोहळा सिंधी मंदिरात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने सिंधी बांधव उपस्थित होते. या सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष भगवान वलेशा, डॉ. भरत गिडवाणी, ब्रिजलाल बिकचंदानी, भरतलाल रोहेरा, बन्सी फेरवानी, परसराम आहुजा, जीवनराम हिरनंदाणी, डॉ. ग्यानचंदाणी, कन्हेय्या कुकरेजा, गुरुमुख रामनाणी, बबलू सिंधवाणी, श्रीचंद गिडवाणी, राम सिंधवाणी, श्रीचंद आहुजा, रवि गोरेला, मोहन कुकरेजा, बबलू आहुजा, अशोक रामनाणी, बाळू आहुजा, मनोज चुग, प्रेम नारा, प्रकाश नारा, जयकिशन मिलानी, प्रताप बठेजा, ओमप्रकाश चुग, किशनचंद भागवानी, अमर चुग, खेमचंद चुग, हितेश चुग यांच्यासह प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतश्री लक्ष्मणदास चेन्नईवाले म्हणाले की, धावत्या जीवनशैलीत मानवाचा मरणाचा वेळ केव्हाही येईल. कुठेही येईल. हे सांगता येत नाही. सेवा आणि सत्संग हा संस्काराचा भाग आहे. जन्म-मृत्यु हे अटळ आहेत. या समाजाच्यावतीने घेण्यात आलेली शवपेटी ही सर्व धर्मियांसाठीच उपयोगी ठरणार आहे. आताच्या काळात शवपेटी ही अत्यंत गरजेची अशी ठरत आहे. शवपेटीमुळे मानवाचे शव आपण दोन तीन दिवस चांगल्याप्रकारे ठेऊ शकतो. लांब अंतराव जरी मृत्यु झाला असला तरी शवपेटीमुळे त्या मानवाचे सर्वांना शेवटचे दर्शन होऊ शकते. यामुळे शवपेटी ही अत्यंत महत्वाची ठरत आहे, असे लक्ष्मणदास महाराज म्हणाले.
यावेळी प्रास्ताविक करतांना डॉ. भरत गिडवाणी म्हणाले की, श्री प्रेमप्रकाश सेवा मंडळाच्यावतीने देण्यात आलेली ही शवपेटी शहरातील सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. सिंधी समाजाने यापूर्वी अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत, असे ते म्हणाले. बन्सीलाल फेरवाणी म्हणाले की, शवपेटीमुळे सर्वधर्मियांना हीचा लाभ होणार आहे. सिंधी समाज नेहमीच शहरवासियांसाठी नेहमीच तत्पर असतो. या समाजाच्यावतीने भविष्यातही चांगले उपक्रम हाती घेण्यात येतील. श्री प्रेमप्रकाश आश्रमाचे अध्यक्ष 1008 श्री भगतप्रकाशजी महाराज यांच्या प्रेरणेने ही शवपेटी मिळाली असल्याचे ते म्हणाले. आभार समाजाचे अध्यक्ष भगवान वलेशा यांनी मानले.