Breaking News

‘प्रवरा’मध्ये कृषीदिनी कृषी-कवी संमेलन


प्रवरानगर

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात दि. ०१ जुलै रोजी कृषीदिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यक्रम समन्वयक प्रविण गायकर यांनी दिली.

या कृषी कवी संमेलनामध्ये मुख्यत्वे शेतकरी व कृषी क्षेत्राशी निगडीत कवितांचे सादरीकरण होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रवरा कार्यक्षेत्रातील कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, दादासाहेब कोते, राजेंद्र कोबरणे व तसेच निमंत्रित कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, पोपटराव पटारे, श्रीमती संगीता फासाटे व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी नवोदित कवी श्रीराम रायते उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलनाच्या अनुशंगाने विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी कृषिभूषण बन्सी तांबे यांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती मिनल शेळके यांनी दिली.