Breaking News

बसची वाट पाहणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या अंगावर फेकली मिरची पूड


औरंगाबाद, दि.30 ः गंगापूर येथील बसस्थानकावर काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बसची वाट पहात थांबलेल्या एका युवतीच्या अंगावर एका अज्ञात माथेफिरूने मिरचीपूड फेकून पोबारा केल्याची घटना घडली. या संदर्भात प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ग्रामीण भागात जाणार्या महाविद्यालयीन युवती बसची वाट पहात थांबल्या असताना एका अज्ञात माथेफिरूने त्यातील एका युवतीच्या अंगावर अचानक मिरचीपूड फेकल्याने मुलींनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपी पसार झाला. यानंतर सदर युवतीला येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येउन घरी सोडण्यात आले. गुन्हेगाराला अटक करण्यासाठी नागरिकांचा जमाव पोलिस स्टेशनमध्ये जमा झाला होता.