कृषीदिनानिमित्त वृक्षारोपन
मिरजगाव येथील सद्गुरु कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी जामखेड तालुक्यातील कवडगाव येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या असणार्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांनी कवडगाव जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांसह गावातून वृक्ष दिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा च्या घोषणा देत वृक्ष लागवड किती महत्त्वाचे आहे, हे सांगत ग्रामपंचायत सरपंच भोरे, चेअरमन राम वाघमारे, मुख्याध्यापक वाघ यांच्याहस्ते वृक्षारोपण करून वृक्ष दिन साजरा करण्यात आला.