दहशतवादा विरोधात भारत-अफगाणिस्तान एकत्र लढा देणार - स्वराज
नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - सीमेपलिकडून होणा-या दहशतवादी कारवायांविरोधात लढा देण्यासाठी भारत-अफगाणिस्तान एकत्रित लढा देतील . कोणत्याही उपक्रमात भारत अफगाणिस्तानच्या लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहील, असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सलाउद्दीन रब्बानी दोन दिवसीय भारत दौ-यावर आहेत. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रतिनिधींच्या स्तरावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर दोन्ही देशांत काही महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. इराणबरोबर त्रिपक्षीय सहयोगातून चाबहार बंदराचा विकास गतीने सुरू आहे. येत्या काही आठवड्यात अफगाणिस्तानला गव्हाचा पुरवठा केला जाणार आहे, असेही स्वराज यांनी सांगितले.