Breaking News

पत्रकाराला मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचे निलंबन करा


नेवासा - ( तालुका प्रतिनिधी)
व्हिडीओ चित्रिकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकार तुकाराम गोडसे यांना मारहाण करणारे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी इंगळे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी. या मागणीसाठी नेवासा तालुका पत्रकार एकता संघांच्यावतीने नेवासा तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
पुणे लोणी काळभोर येथील कवडीपाट टोलनाक्यावर केमिकलच्या ट्रकला लागलेल्या आगिचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला ग्रामिण पोलिसांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. पत्रकार तुकाराम गोडसे यांना आगिच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले होते. या घटनेचा निषेध करत गोडसे यांना मारहाण करणारे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे कर्मचार्‍यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नेवासा तहसीलदारांना नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसापासून पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यामध्ये वाढ होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर पोलीस प्रशासन कायदा हातात घेऊन असे कृत्य करीत असेल तर सामान्य नागिराकांसोबत कसे वागत असतील असा सवाल निर्माण झाला आहे.
यावेळी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर यांना नेवासा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दरंदले, सचिव सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे , जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे ,अशोकराव तुवर ,रमेश पुंजाराम शिंदे,शंकर नाबदे, मोहन गायकवाड ,उमाकांत भोगे, पवन गरुड, गांधारे भाऊसाहेब, शामराव मापारी ,मकरंद देशपांडे, अशोक डहाळे हे यावेळी उपस्थित होते.