Breaking News

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन:सायना पराभूत


जकार्ता वृत्तसंस्था
भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जकार्ता येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत चीनच्याचेन युफेई हिने तिला २१-१८, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सायनाने इंडोनेशियाच्या दिनार द्याह अयुस्टीन हिला २१-१२, २१-१२ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले होते. या सामन्यात सायनाने पूर्ण वर्चस्व राखतपुढील फेरीत प्रवेश केला होता. चीनच्या प्रतिस्पर्धी बॅडमिंटनपटूने तिला स्पर्धेत डोके वर काढू दिले नाही.

सामन्यातील पहिला गेम काही प्रमाणात अटीतटीचा झाला. सामन्यातील पहिला गुण युफेईने कमावला आणि त्यानंतर तिने गन मिळवण्याचा तडाखा सुरूच ठेवला. सायनानेपहिल्या गेममध्ये १०-१० अशी बरोबरी साधत सामन्यात ‘कमबॅक’ करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न अपयशी ठरला आणि तिने पहिला गेम गमावला. दुसरा गेमदेखीलपहिल्या गेमइतकाच रोमांचक होणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण हा गेम पहिली गेमपेक्षा झटपट संपला. चीनच्या युफेईने हा गेम आणि सामना आपल्या नावावरकेला.दरम्यान, काल झालेल्या पहिल्या फेरीत पी. व्ही. सिंधू हिने विजयी सलामी दिली आहे. थायलंडच्या पोर्न्पावी चोचुवाँग हिचा तिने २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केलाअसून दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे जपानच्या अया ओहोरी हिचे आव्हान असणार आहे.