Breaking News

पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा निषेध


श्रीरामपूर ( प्रतिनिधी )
लोणी काळभोर येथील पत्रकार तुकाराम गोडसे यांना पोलीस कर्मचार्‍याकडून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याच्या निषेध करून मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला निलंबित करून कठोर शिक्षा करावी . अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. सदर निवेदनात नमूद केले आहे कीपत्रकार तुकाराम गोडसे हे 4 जुलै रोजी पहाटे 5 वाजता कवडी पाट टोल नाक्यावर केमिकलच्या ट्रकला लागलेल्या आगीचे वार्तांकन करण्यासाठी गेले असतांना एका लक्झरी ड्रायव्हर व पोलिसांमध्ये बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. ते फुटेज पत्रकार तुकाराम गोडसे यांनी घेतले असता पोलिस कर्मचारी इंगळे यांनी तु मला न विचारता व्हिडिओ का काढला ? तो डिलेट कर असे म्हणत मारहाण करून शिवीगाळ केली . ही घटना देखील कॅमेर्‍यात कैद झाली असुन सदर पत्रकाराला केलेल्या मारहाणीचा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला . तसे निवेदन तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक चंद्रकांत लांडगे, जिल्हा संपर्क प्रमुख हरिभाऊ बिडवे, जिल्हा समन्वयक रामेश्‍वर आरगडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र देसाई, तालुकाध्यक्ष संदिप जगताप, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय थोरात, बापूसाहेब नवले, मोहन जगताप, निलेश राऊत, युनुस इनामदार, विकास बोर्डे, एकनाथ डांगे, राजेश बोरूडे, भरत थोरात, विठ्ठल गोराणे व इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.