Breaking News

तंबाखू आणि तणाव हीच हार्ट अटॅकची मुख्य कारणे - डॉ. श्रीकांत कोले


मुंबई : हृदय रोगाबद्दल अजूनही लोकांमध्ये समज-गैरसमज आहेत. या आजाराबद्दल जनजागृती झालेली नाही हृदय रोग किंवा हार्ट अटॅक त्यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक व दुय्यम सुविधांची कमतरता आहे. यासंबंधी आजार बरे झाल्यानंतर पुढे दहा ते वीस वर्षे उपचार घ्यावाच लागतो. यात खंड पडून चालत नाही भारतासारख्या देशात अगदी कमी वयात हार्ट अटॅक येतो. अनुवंशिकता, व्यसन अनियमित आहार, ताणतणाव मधुमेह याची मुख्य कारणे आहेत. त्यापैकी तंबाखू आणि तणाव हेच भारतातील हार्ट अटॅक येण्याचे मोठे कारण आहे. पालक शाळा आणि समाज या तिन्ही स्तरांवर याची जागरुकता व शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यामुळे ५० टक्क्याहून अधिक याचे प्रमाण कमी होऊ शकते असे मत सुप्रसिद्ध हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. श्रीकांत कोले यांनी व्यक्त केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित जन जागृती कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन पर चर्चासत्रात ते बोलत होते. तंबाखू व तणाव हेच मुख्य कारण आहे.कारण केसापासून नखापर्यंत यामुळे शरीराची हानी होते.प्रत्येक माणसामागे भारतात एक हजार सिगरेट बनवल्या जातात यावरून ही परिस्थिती किती भयावह आहे हे समजते. तंबाखूचे पीक लावल्यास त्याला कुंपण घातले जात नाही. कारण गाढव सुद्धा हे पीक खात नाही.पण माणूस याच्या आहारी गेला आहे .असा मार्मिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.म्हणूनच तंबाखूही आयुष्यासाठी हानिकारक आहे असे डॉ.कोले म्हणाले. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याने हृदयविकार संभवतो. पुरुषांमध्ये महिलांपेक्षा हार्ट अटॅक ची शक्यता जास्त असते. कमी वयात लठ्ठपणा आणि जास्त मिठाचे सेवन यामुळे फक्त हृदयावरच नाही तर मेंदूत रक्तस्राव होणे, आंधळेपणा, किडनी खराब होणे अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक जास्त आढळते.सीपीआर रुग्णालयात रक्तदाब व त्या अनुषंगाने येणारे हृदय रोग व संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही चिंताजनक बाब आहे छातीत दुखणे, दम लागणे, घाम सुटणे ही हार्ट अटॅकची लक्षणे असतात.म्हणून लवकरात लवकर निदान करून योग्य वेळी उपचार घेणे आवश्यक आहे,असे मत हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अक्षय बाफना यांनी व्यक्त केले.शेवटी लोकांच्या या संदर्भातील अनेक शंकांचे निरसन तज्ज्ञानी केले.