Breaking News

तालुक्यासाठी 81 हजार 822 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट


शासनाच्या वन विभागामार्फत चालु वर्षी 13 कोटी वृक्ष एकच लक्ष या योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीसाठी 81 हजार 822 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आले असून, सामाजिक वनीकरण विभागास 23 हजार 555 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आले, त्याची सुरूवात चांदेकसारे गावापासून करण्यात आल्याची माहिती आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली. याप्रसंगी संजीवनी कारखाण्याचे उपाध्यक्ष सोपान पानगव्हाणे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संचालक संजय होन सुभाष आव्हाड, श्रीपत गवळी, बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजी वक्ते, मा. सरपंच केशव होन, वनपाल नंदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चांदेकसारे गांवच्या सरपंच पुनम खरात यांनी वनीकरणांचे महत्व पटवून दिले. उपसरपंच अशोक होन यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, जागतिक तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे, परिणामी पर्जन्यमान कमी होत आहे, वृक्षांचे जंगल कमी होवून सिमेंटची जंगले उभी राहात आहेत. 
शासनांच्या या उपक्रमात जनतेने मोठे सहकार्य करावे असे सांगुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनीही त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी कोपरगाव तालुक्यात मोठया प्रमाणांत वृक्षलागवड करून पर्यावरण वाढविण्यांवर भर दिला असल्याचे शेवटी सांगितले. संचालक संजय होन यांनी आभार मानले.