Breaking News

‘श्रीगणेश’च्या दीपालीची ‘नॅशनल योगा’साठी निवड


राहाता प्रतिनिधी

पंजाब येथे होत असलेल्या नॅशनल योगा स्पर्ध्येसाठी श्री गणेशच्या दीपाली आरने हिची निवड झाली आहे. सोलापूर येथे दि. २९ जून रोजी स्टुडंट ऑलिंपिक असोशिएशनच्यावतीने स्टेट लेव्हल योग स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध्येत दीपाली आरने हिने नेत्रदीपक कामगिरी बजावत गोल्डमेडल मिळविले.

आरने हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री गणेश शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. विजय शेटे यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गणेशचे मॅनेजिंग ट्रस्टी भारत शेटे, विश्वस्त संदीप चौधरी, कार्यकारी अधिकारी प्रा. राहुल वल्टे, स्कूल प्रिन्सिपॉल रामनाथ पाचोरे, ज्यु कॉलेज प्राचार्य प्रा. रियाज शेख यांनीही आरनेचे विशेष कौतूक केले.