Breaking News

मुलांना पळविणा-या टोळीच्या संशयावरुन जमावाने ५ जणांना ठेचून मारले


मुलांना चोरणा-या टोळीच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर परिसरातील राईनपाडा येथे जमावाकडून सोलापूर येथील ५ जणांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. हि आज दुपारच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस रवाना झाले असून जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण राज्यातच मुले चोरणा-यांबाबात अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत असल्याचे समोर येत आहे. त्याच अफवाचा परिणाम म्हणजे साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्येही अशीच घटना घडली आहे. सातारा आणि सांगलीतील सातजण राईनपाड्यात आले होते. बाजार असल्याने मुलं पळवायला टोळी आल्याची अफवा यावेळी गावात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी पाचजणांना ठेचून मारले. यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात टाकून दिले आणि पोलिसांनीदेखील मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. पोलीस महानिरीक्षकांनी बंदोबस्तासाठी नंदुरबार, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील फौजफाटा मागवला आहे. पोलीसांकडून अधिक तपास केला जात आहे