Breaking News

प्रत्येकाने किमान पाच झाडे लावा : भोरे


जामखेड / ता.प्रतिनिधी 
पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर, प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान पाच झाडे लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन येथील शिवनेरी अकॅडमीचे संस्थापक निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.
जैन कॉन्फरन्सच्या चतुर्थ झोनमार्फत 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत एक हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षारोपनास शहरातील शिवनेरी अकॅडमीमध्ये प्रारंभ करण्यात आला. यावेळी भोरे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, गणेश भळगट, सुमित चानोदिया, सागर नेटके, नारायण नागरगोजे, अन्सार शेख यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कोठारी म्हणाले, गेली पंचवीस वर्षापासून झाडे लावण्याच्या उपक्रम हाती घेतला जातो. जैन कॉन्फरन्सच्या युवा शाखेतर्फे चाळीस हजार झाडे लावण्यात आली. यासाठी शशिकांत कर्नावट यांनी पुढाकार घेतला. तर संपुर्ण देशात 87 हजार रक्त दात्यांकडुन रक्तदान करून घेण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली.