Breaking News

सुतार, लोहार संघाचे अध्यक्षपदी दतात्रय क्षिरसागर


अळकुटी / वार्ताहर 
पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय क्षिरसागर यांची महाराष्ट्र सुतार, लोहार संघाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अहमदनगर येथे राज्यस्तरीय संघाची चिंतन बैठक सुदाम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, महापौर सुरेखा कदम, नगरसेविका ठाणगे, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय क्षिरसागर यांनी सांगितले की, समाजाने टाकलेला विश्‍वास हा कामाच्या माध्यमातून सार्थक ठरवून दाखवू. लवकरच संपुर्ण तालुक्यात कार्यकारिणीची बैठक श्री क्षेत्र पिंपळनेर येथे बोलाविण्यात येईल. त्यामध्ये नवीन कार्यकारिनी उभारु व सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. दतात्रय क्षिरसागर यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.