Breaking News

आरपीआयच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


अहमदनगर (प्रतिनिधी) 

भिंगार शहर आरपीआयच्या वतीने भिंगार मधील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन, त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप देण्यात आली. 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे ज्येष्ठ नेते संभाजी भिंगारदिवे तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव अशोक गायकवाड, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनिल काळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, जिल्हा उपाध्यक्ष पापा बिवाल, भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष संजय कांबळे, लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष सोमा शिंदे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राजू मगर, संजय बोरगे, प्रदिप कदम, राहुरी युवक अध्यक्ष सनी काकडे, सतीश चकरे, पवन भिंगारदिवे, भारिपचे योगेश थोरात, अमोल भिंगारदिवे, आदी उपस्थित होते.

उपस्थितांच्या पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, शालेय साहित्य भेट देऊन, पुष्पगुच्छ ऐवजी रोपांचे वाटप करण्यात आले. आभार विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश मोकळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिष सोलंकी, करण काळे, नरेंद्र छजलाने, अमित घोरपडे, अक्षय करोसिया, वनीत चौहान आदींनी परिश्रम घेतले.