Breaking News

प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालयात करिष्मा शेख प्रथम


प्रवरानगर / प्रतिनिधी 
जून 2018 मध्ये घेण्यात आलेल्या, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिक्षेचा निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच जाहीर केला. लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सरासरी निकाल 76 टक्के इतका लागला असून, उत्कृष्ट निकालाची परंपरा याहीवर्षी कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या तुलनेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल उत्तम असल्याचे सांगताना प्राचार्य डॉ. खर्डे यांनी 68 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर, 35 विद्यार्थी फर्स्टक्लासमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. यामध्ये करिष्मा शेख 80. 92 टक्के गुण मिळवून प्रथम, प्रतीक्षा लहामगे 78.14 टक्के गुण मिळवून द्वितीय तर, ऋषिकेश दिघे 77.64 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे राज्याचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.