Breaking News

आत्मा मालिकचा यश राज्यस्तरीय विजेता


कोपरगाव / श. प्रतिनिधी  
तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलचा विद्यार्थी यश खरपुडे हा केंद्र शासनाच्या नॅशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड हयुमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन आयोजित ‘ऑल इंडिया स्वच्छ भारत’ कला प्रतियोगितामध्ये हा प्रथम क्रमांकाने राज्यस्तरावर विजेता ठरला आहे. तर पवन कदम हा जिल्हास्तरावर विजेता ठरला. सन 2019 मध्ये गांधीजींची 150 वी जयंती असणार आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत निर्माण करुन महात्मा गांधीजींना अभिनव आदरांजली अर्पन करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये, स्वच्छ भारत अभिनयाबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने स्वच्छ भारत कला प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून 589 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, पर्यवेक्षक रविंद्र देठे, बाळासाहेब कराळे, कलाध्यापक मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, शुध्दोधन ससाणे, गंगाधर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे संत परमानंद महाराज, देवानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्‍वस्त प्रकाश भट, प्रभाकर जमधडे, वसंत आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधव देशमुख यांनी अभिनंदन केले.