Breaking News

देशात सर्वांनी एकजूटीने राहणे काळाची गरज : उस्ताद काशीद


जामखेड शहर प्रतिनिधी - तरूणांच्या गळ्यातले ताईत असलेले वसीम कूरैशी उर्फ बिल्डर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व पक्ष, संघटना , सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून जातीय सलोखा जपण्याचे काम करत आहेत. त्यांचा हा उपक्रम कौतूकास्पद आहे. आम्ही सर्व एकच असून या देशात सर्वांना एकजूटीने राहण्याची काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी उस्ताद बबन काका काशीद यांनी केले. 
वसीम कूरैशी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा जपण्यासाठी 
वसिमभाई कूरैशी उर्फ बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने ईद मिलन व शिरखूर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक शेखलाल भाई शेख होते. प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र केसरी उस्ताद बबन काका काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधूकर राळेभात, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, यूवा नेते जयदत्त धस, माजी सभापती डॉ भगवान मूरूमकर, नगरसेवक शमीरभाई सय्यद, अमित चिंतामणी, राजेश वाव्हळ, पवन राळेभात दिगंबर चव्हाण, अमित जाधव, गूलशन अंधारे, मोहन पवार, शाकीर खान, फिरोज कूरैशी, अँड प्रविण सानप, अझरभाई, हाजी मूख्तारभाई (जनता टेलर ) सय्यद, माजी ग्रा.पं. सदस्य इम्रान कूरैशी, इस्माईल सय्यद, हाजी मंजूरभाई सय्यद, इस्माईल (टेलर) शेख, काँग्रेसचे अ‍ॅड. बंकटराव बारवकर, डॉ सूहास सूर्यवंशी, समीर पठाण, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफूले, बाजार समितीचे संचालक सागर सदाफूले, जमीर सय्यद, मून्नाभाई अनसार, राहुल कांबळे, सिने अभिनेते नजीरखान प्रदीप चिटणीस , डॉ. शौकत शेख, मूजीब सैयद अ. नगर , सोहेल काझी, राशीन 
भारिपचे बापू गायकवाड, संतोष पवार, लक्ष्मण ढेपे, राष्ट्रवादीचे यूवक अध्यक्ष शरद शिंदे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जाकीर शेख यांनी केले. तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वसीम कूरैशी उर्फ बिल्डर मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या उत्साहात वसीम बिल्डर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तरूणांचा जल्लोष बघण्यासारखा होता.


 जामखेडमध्ये दूहेरी हत्याकांड झाले तेव्हा शहरात कोणताच फ्लेक्स बोर्ड न लावण्याचा ठराव घेतला. शहराचे विद्रूपीकरण थांबवून शहरात शांतता राहावी म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होत असतांना शहरात कूठेही फ्लेक्स बोर्ड न लावून खरी एकात्मता व जातीय सलोखा वसीम बिल्डर यांनी जपला आहे.
 प्रा. मधूकर राळेभात.