Breaking News

कर्जत-जामखेडच्या शाळांमध्ये होणार 100 संगणक व एलसीडी प्रोजेक्टरचे वितरण


कुळधरण : प्रतिनिधी - शिक्षण विभाग पंचायत समिती कर्जत व जामखेड तसेच नॅशलन इन्शुरन्स कंपनी प्रा. लि.यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या 100 प्राथमिक शाळांना संगणक, एलसीडी प्रोजेक्टर व प्रोजेक्टर पडदा या साहित्याचे वितरण आज ( दि.2 जुलै) रोजी केले जाणार आहे. पालकमंत्री व जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते हे वितरण होत असून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी प्रा.लि. यांच्या सी.एस.आर फंडातून या साहित्याचे वितरण होणार आहे. कर्जत तालुक्यातील 54 व जामखेड तालुक्यातील 46 शाळांना प्रत्येकी 1 एलसीडी प्रोजेक्टर, प्रोजेक्टर पडदा व संगणक संचाचे वितरण केले जाणार आहे.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनिल चौहान, शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, नॅशलन इन्शुरन्स कंपनीचे महाप्रबंधक व निर्देशक जॉन पुलिंथनम, मुख्य क्षेत्रीय प्रबंधक व्ही.प्रबाकरन, क्षेत्रीय प्रबंधक श्रीम.आर.के.एल्लाबादी, वरिष्ठ मंडळ प्रबंधक श्रीम. प्रमिला जाधव, सभापती पुष्पाताई शेळके, उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, अशोक शेळके, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, पोपट काळे तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मुख्याध्यापक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.