Breaking News

साता-यात 84.9 मि.मी. पाऊस


सातारा - सातारा जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 84.9 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 7.7 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 6 (163.8) मि. मी., जावळी- 16 (232.3) मि.मी. पाटण-12.5 (224.4) मि.मी., कराड 3.2 (161.5)मि.मी., कोरेगाव- 0.6 (107.6) मि.मी., खटाव-2.3 (162.2) मि.मी., माण-0 (80.4) मि.मी., फलटण- 1.6 (87.2) मि.मी., खंडाळा- 0 (112.8 ) मि.मी., वाई - 1.1 (144.5) मि.मी., महाबळेश्‍वर-40.9 (589.1) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 2065.8 मि.मी. तर सरासरी 187.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील पाणी पातळी
जिल्ह्यातील धरणांचा आजचा एकूण पाणीसाठी दलघमी मध्ये पुढीलप्रमाणे कंसात एकूण टक्केवारी देण्यात आली आहे. उरमोडी 107.90 (36.24), धोम बलकवडी 24.42 (18.75), तारळी 28.12 (16.85), नागेवाडी 1.99 (24.07), मोरणा (गुरेघर) 26.13 (63.72), उत्तरमांड 8.25 (32.21), कुडाळी महू 0.17 (0.0), कुडाळी हातगेघर 1.46 (18.93), वांग (मराठवाडी) 3.76 (4.58), चिखली 1.13 (58.15), जांभळी 1.03 (53.79), पांगारे 0.56 (18.80), कुसवडे 1.39 (37.20), काळगांव 1.20 ( 41.80) तर कोयना 704.8282 (24.85).