Breaking News

दंडकारण्य अभियानांतर्गत दुधेश्‍वर डोंगरावर वृक्षारोपण


संगमनेर प्रतिनिधी

पर्यावरणाचे संवर्धन हे सर्व सजीव प्राण्यांसाठी महत्वाचे आहे. १३ व्या वर्षीच्या दंडकारण्य अभियानांतर्गत आज [दि. १६] दुधेश्‍वर डोंगरावर रिमझिम पावसात वृक्षारोपण केले. येथील जयहिंद महिला मंचच्या शेकडो महिला भगिनींनी यासाठी पुढाकार घेतला. 

तालुक्यातील निमगांव जाळी येथील दुधेश्वर डोंगर या निसर्गरम्य परिसरात वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम पार पडला. जयहिंद महिला मंच, वामनराव कान्हुजी जोंधळे सेवाभावी संस्था, तारांगण फ्रेंडस् सर्कल, पंडित नेहरू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज निमगांव जाळी तसेच वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयु देशमुख, सभापती निशा कोकणे, प्रतिभा जोंधळे, अर्चना बालोडे, बेबी थोरात, स्वाती मोरे, सोनाली शिंदे, सुहासिनी गुंजाळ, रुपाली औटी, सुनंदा जोर्वेकर, वंदना गुंजाळ, नयना राहणे, नंदा कढणे, विद्या गुंजाळ, सुनिता कांदळकर, सुनिता जगनर, शिला करंजेकर, मंगल खरात, मनिषा बिडवे, दिपाली जोंधळे, सोमनाथ जोंधळे, बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते. या डोंगरावर आंबा, चिंच, सिसू, निलगिरी, बाभळ, सिताफळ आदी वेगवेगळी झाडे लावण्यात आली. यावेळी दुर्गा तांबे, शरयु देशमुख यांची भाषणे झाली. 

प्रकाश वदक, एकनाथ खरात, डॉ. सुरेश जोंधळे, भैय्यासाहेब जोंधळे, सोमनाथ खरात, शिवाजी जोंधळे, आबासाहेब शिंदे, दिपक येवले, निलेश तांबे, मच्छिंद्र तांबे, परसराम जोंधळे, बबनराव जोंधळे, मंगेश अरगडे, सुधीर डेंगळे, माऊली डेंगळे, अविनाश जोंधळे, सोमनाथ तांबे, गणेश वदक, विजय जोंधळे, व आदी ग्रामस्थ तसेच प्राचार्य देशमुख, वनविभागाचे पर्यवेक्षक रामदास थेटे, गिते, सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन प्रतिभा जोंधळे यांनी केले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.