Breaking News

नारायणगव्हाण येथे रविवारी माजी सैनिकांचा मेळावा


सुपा  प्रतिनिधी 

शिरूर, पारनेर, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील माजी सैनिकांचा मेळावा नगर पुणे महामार्गावरील दुर्गा लाॅन्स मंगल कार्यालय येथे येत्या रविवारी, दि. २२ जुलै २०१८ रोजी सकाळी. ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे. शिरूर, पारनेर, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा माता-पिता व शहिद परीवारातील सदस्यांनी यावेळी मोठ्या संखेने हजर रहावे, असे आवाहान संयोजक निवृत्त कर्नल साहेबराव शेळके व पारनेर तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष सहदेव घनवट यांनी केले.

दरम्यान, या चारही तालुक्यांतील १० वी व १२ वीच्या परीक्षामध्ये चांगले मार्क्स् मिळालेल्या विद्यार्थ्यांना डाॅ. अण्णासाहेब हजारे व हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमास पद्मभूषण डाॅ. अण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी राहुल द्रीवेदी, हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपट पवार, मेस्कोचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश खाडे, निवृत्त कर्नल सुहास जतकर, निवृत्त मेजर र. गो. कुलकर्णी, निवृत्त ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर. आर. जाधव, देवदैठण येथील संस्कार पब्लिक स्कुलचे अध्यक्ष संजय कौठाळे आदी उपस्थित राहणार आहेत.