Breaking News

मोकाट जनावरांचा सुळसुळाट


कोपरगाव / श. प्रतिनिधी 
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असुन, नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर, विघ्नेश्‍वर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक अशा गर्दीच्या ठिकाणी तसेच बाजारतळ, सप्तर्षीमळा या भागात मोकाट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. मागील आठवड्यात सप्तर्षीमळा येथे मोकाट कुत्र्यांनी एका लहान शाळकरी मुलावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यामुळे पालक मुलांना एकटे शाळेत पाठवायला घाबरत आहेत. तसेच मुख्य रस्त्यांवर दुभाजकाजवळच गाढव प्राणी एका रेषेत उभे राहून वाहतुकीला अडथळा करतात. तसेच छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोकाट गाई भर रस्त्यावर घोळका करून बसलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. नगरपालिकेकडे चौकशी केली असता, मोकाट जनावरांना पकडून डांबून ठेवण्याचा ठेका संपल्याचे सांगण्यात येते.