देर्डे कोर्हाळे येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
कोपरगाव / श. प्रतिनिधी
तालुक्यातील देर्डे कोर्हाळे येथे संजीवनी उद्योेग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजीवनीचे संचालक अरूण येवले होते. प्रारंभी सरपंच योगीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अशोक डुबे, पुंडलिक डुबे, गीताराम डुबे, राजेश डुबे, भाऊसाहेब डुबे, भरत डुबे, विष्णुपंत डुबे, बाबासाहे डुबे आदी उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलताना संचालक अरूण येवले म्हणाले की, गरजु होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्यांचे वितरण करण्यात येते. सामाजिक दायित्व म्हणून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आपल्या पदाच्या माध्यमांतुन विविध उपक्रम सुरू करून, त्याचा आदर्श सर्वत्र निर्माण केला आहे. यावेळी अरूण येवले व सहकार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.