राहुरी तालुका मार्केट डिरेक्टरीच्या 11 व्या आवृत्तीचे प्रकाशन
राहुरी / ता. प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या आणि सर्वसामान्य नागरीकांच्यादृष्टीने उपयुक्त असणार्या दूरध्वनी व मोबाईल क्रमांकांची सूची असणारी राहुरी तालुका मार्केट डिरेक्टरीच्या 11 व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही चंद्रकांत खैरे यांच्या संकल्पनेतून सलग 20 वर्षांपासून सातत्याने प्रसिद्ध होत असलेल्या राहुरी तालुका मार्केट डिरेक्टरी ही राहुरी तालुक्यातील सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. या डायरीमध्ये राहुरी तालुक्यातील सर्व दूरध्वनी क्रमांक, व्यापार्यांचे मोबाईल नंबर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अती महत्वाचे क्रमांक समाविष्ट असलेली ही डायरी अतिशय उपयुक्त असून खैरे यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅड. सयाराम बानकर, अहमदनगर जिल्हा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले, राहुरी नगरपरिषदेचे नगरसेवक शहाजी ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले, पत्रकार निसार सय्यद, पत्रकार रमेश बोरूडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पत्रकार संजय कुलकर्णी, प्रसाद मैड, मुखतार सय्यद, समीर शेख, मनोज साळवे, मिनाष पटेकर, महेश कासार, अपना टिके, संजय खैरे, बाळासाहेब जाधव, गोपाळ सायबोळ, दिलीप सूर्यवंशी, उद्धव इंगळे, नामदेव मोरे, गणेश खैरे, आदिक खैरे, सोमनाथ खैरे, राजेंद्र सुर्यवंशी, प्रशांत खैरे, प्रज्वल खैरे, अंकुश खैरे, आशु कदम, आकाश शिरसाठ, सनी कडक, प्रशांत भंडारी, प्रथमेश पोपळघट, यश खैरे, अजिंक्य सुर्यवंशी, अश्विन फुलसौंदर आदींसह अनेक नागरीक उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार पत्रकार प्रा. वसंत झावरे यांनी केले.