Breaking News

वृक्षतोड झाल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले


अळकुटी / वार्ताहर 
पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे असुन, वृक्षतोड झाल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. वृक्षतोड थांबवणे हे गरजेचे आहे. म्हस्केवाडी येथील देवराई प्रकल्प हा अतिशय सुंदर योग्य नियोजनाच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून नावलौकिक होत आहे. त्याची दखल महाराष्ट्र शासन नक्कीच घेईल असे विजय औटी यांनी सांगितले. 
सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत निर्मलग्राम म्हस्केवाडी समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तसेच बिहार पॅटर्न रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड आ. विजय औटी व जिल्हा वन अधिकारी किर्ती जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमासाठी जि.प. सदस्य काशिनाथ दाते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले, लक्ष्मण म्हस्के, शिवसेना विभाग प्रमुख सखाराम उजघरे, संजय ठुबे, डॉ. बाबुराव म्हस्के, नितीन परंडवाल, कृषी अधिकारी बोरुडे, ग्रामसेवक भालेराव, वनपाल जाधव, बापु म्हस्कुले, म्हस्केवाडी ग्रामस्थ, पदाधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र म्हस्के यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानाचे माध्यमातून वृक्ष लागवड व वृक्षांचे संगोपन केले.