Breaking News

प्रशस्त जागेमुळे संकल्पना राबविणे शक्य : तोरणे


कोपरगाव ता. प्रतिनिधी

आशा स्वयंसेविका गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेतात. याबरोबरच जन्माला आलेल्या मुलाला प्रदूषणरहित स्वच्छ हवा मिळण्याची गरज आहे. येथील आरोग्यकेंद्रात त्यासाठी झाड लावण्याची गरज आहे. सुदैवाने आरोग्यकेंदाच्या आवारात जागा उपलब्ध आहे. त्यामुळे ‘एक मुल, एक वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सहज शक्य झाले, असे प्रतिपादन आरोग्य सेविका रेखा तोरणे यांनी केले.

तालुक्यातील दहिगाव बोलका येथे आशा स्वयंसेविकांनी ‘एक जन्म, एक वृक्ष’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, प्राथमिक आरोग्यकेंद्रात आशा स्वयंसेविकांच्यावतीने दाखल केलेल्या गर्भवती महिलांना मुल झाल्यावर ‘एक जन्म एक वृक्ष’ या उपक्रमाअंतर्गत एक झाड लावले जात आहे. याकामी त्यांना आरोग्यआधिकारी प्रज्ञा भगत, वैशाली बडदे यांचे सहकार्य मिळत आहे. आशा गट प्रवर्तक जयश्री खंडीझोड, स्वयंसेविका सुनिता खंडीझोड, राजश्री साबळे, शीतल गायकवाड, सिमा वलटे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.