नागपूर विधानभवन परिसरात नवीन विस्तारित इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ
नागपूर : विधानभवनाच्या मुख्य इमारतीच्या पश्चिम बाजूला असलेल्या विस्तारित दोन मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. विस्तारित इमारत येत्या दहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून या इमारतीमध्ये मंत्री दालने तसेच उपहारगृह आदी सुविधा राहणार आहेत.
याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विधी मंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.