मनोरा आमदार निवास घोटाळा ः साबां मंत्र्यांना बदनाम करण्याच्या हेतूने फेर अहवालाची खेळी
मुंबई/विशेष प्रतिनिधी : मनोरा आमदार निवास घोटाळा प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर झाला असताना, या अहवालावर अंशतः कारवाई झाली, कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली असतांना अहवालात उणिवा असल्याचे भासवून हे प्रकरण सरकार आणि साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याचे अस्त्र म्हणून वापरले जात असल्याचे मानले जात आहे.
.............................................................
शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी आपल्या अधिकारात मनोरा इमारतीतील आमदारांच्या तब्बल 31 क क्षांत बोगस कामे दाखवून कोट्यावधीची देयके अदा केली होती. यावर आक्षेप नोंदवून आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबां मंत्री चंद्रक ांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून चौकशी करण्यास भाग पाडले होते. ही चौकशी होऊ नये किंवा झाली तर प्रलंबित रहावी आणि या मुद्याचे भांडवल करून साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करणे शक्य व्हावे असा प्रयत्न प्रशासनाकडून सातत्याने सुरू होता आणि आहे.
या पार्श्वभुमीवर पहिल्या दहा कक्षांची तपासणी करून मुंबई साबांचे अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. या अहवालात चौकशी अधिकारी म्हणून अपहार झाल्याचे निष्पन्न होत असल्याचे आणि त्या अपहाराला तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि त्यांचे सहअभियंते जबाबदार असल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. या अहवालावरून ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी सह अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले होते. त्यानंतर प्रज्ञा वाळके याही निलंबित झाल्या, आता फौजदारी कारवाई दृष्टीपथावर होती. ही कारवाई झाली तर चंद्रकांत दादा पाटील भ्रष्टाचारी अभियंत्यांना गजाआड करणारे पहिले साबां मंत्री ठरले असते. हा इतिहास लिहिला जाऊ नये. ना.पाटील यांना संधी हातून जाऊ नये म्हणून प्रशासनातील काही नतद्रष्ट प्रवृत्तींनी सुर्यवंशी यांच्या अहवालात उणिवा असल्याचा आभास निर्माण केला. आणि पुढील कायदेशीर सोपस्कार टाळण्यासाठी फेर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामागे चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याची भुमिका कार्यरत असल्याची चर्चा साबांत सुरू आहे.
क्लीनचीट अहवालाची आठवण
माजी साबां मंत्री छगन भुजबळ यांच्याविरूध्द एसीबीकडे दाखल असलेल्या तक्रारीसंदर्भात शहर इलाखा साबां विभागाने घेतलेल्या भुमिकेची पुनरावृत्ती मनोरा आमदार निवास घोटाळ्याच्या चौकशी अहवालातील शोधल्या गेलेल्या उणिवांमधून झाली आहे. तेंव्हा भुजबळ यांना क्लीन चीट देणारा अहवाल केवळ चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्यासाठी दिला गेला होता. या अहवालाविषयी साबां मंञ्यांना कुठलीही कल्पना दिली नसल्याने प्रश्नांना उत्तरे देतांना त्यांची फजीती झाली होती, तोच प्रकार या प्रकरणातही सुरू आहे.