Breaking News

घोडेगाव-शिंगणापूर रस्ता अंधारात


सोनई : घोडेगावहून शनिशिंगणापूरकडे जात असलेल्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड अंधार आहे. हा रस्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी डांबरी करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबांवर गेल्या अनेक दिवसांपासून विजेचे दिवे बंद आहेत. परिणामी रात्रीच्यावेळी दुचाकी चालक समोरून येत असलेल्या वाहनांच्या प्रखर उजेडामुळे रस्त्यालगतच्या झाडांना धडकत आहेत. त्यामुळे शिंगणापूर ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन या रस्त्याच्या कडेला असलेले पथदिवे तात्काळ सुरु करावेत, अशी मागणी केली जात आहे.