Breaking News

प्लास्टिकमुक्तीच्या जनजागृतीसाठी नागरिकांची दिंडी


राज्य शासनाने प्लास्टिक वापरण्यास बंदी घातल्यानंतर याविषयी जनजागृती करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने नागरिकांची भव्य दिंडी काढण्यात आली. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांसह व्यापाऱयांनी बऱयाच प्रमाणात प्लास्टिक वापरणे बंद केले.

शहरात अजूनही काही ठिकाणी प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आणि नगरसेवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने या दिंडीत भाग घेतला. यावेळी शहराच्या विविध भागांतून दिंडी काढत प्लास्टिक गोळा करण्यात आलले. यामध्ये थर्माकोलची ताटे, प्लास्टिक ग्लास, स्ट्रॉ आदी वस्तूंचा समावेश आहे. या रॅलीला दिंडीचे स्वरूप देण्यात आले होते. यामध्ये टाळ-मृदंग आणि वारकऱ्यांच्या भूमिकेत नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे ही स्वच्छता दिंडी मोठी आकर्षक ठरली. यावेळी बांधकाम समितीचे सभापती जनार्दन कदम, बाळासाहेब आढाव, बोरावके गिरमे आदी उपस्थित होते.