Breaking News

‘आत्मा मालिक’चे विद्यार्थी गुणवत्ता यादीत


कोपरगांव : मॉर्डन एज्युकेशन सोसायटी सेंटर फॉर टॅलन्ट सर्च सेंटर अॅन्ड एक्सलन्स नवरोजी वाडिया कॉलेज, पुणे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत कोकमठाण (ता. कोपरगांव) येथील आत्मा मालिक माध्य. व उच्च माध्य. गुरुकुलाचे ६९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. प. पू. आत्मा मालिक माऊली, संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.