Breaking News

वनविभागाकडून सावरगाव तळ येथे सामुदायिक वृक्षारोपण


संगमनेर/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या वतीने ’एकच लक्ष्य तेरा कोटी वृक्ष’’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी संगमनेर तालुक्यात प्रबोधन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. संगमनेर उपविभागीय वनअधिकारी कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रबोधन फेरीत तालुक्यातील सावरगाव तळ येथे सामुदायिक वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच नेहाताई गाडे, उपसरपंच शिवनाथ नेहे, प्रवरा विद्यालय स्कुल कमिटीचे अध्यक्ष परशराम नेहे, का. पो. गोरक्षनाथ नेहे, ग्रामसेवक चांगदेव दरेकर, पत्रकार गोरक्ष नेहे, बाबासाहेब नेहे, नानासाहेब नेहे आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस झाडे नष्ट होत चालल्यामुळे पाऊसपाणी वेळेवर होत नाही, त्यामुळे प्रत्येकाने गावात चराई बंदी, कुर्‍हाड बंदी, बोरबंदी होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसरात झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन स्वयंप्रेरीत संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. संपूर्ण झाडाची जपवणूक व संवर्धन करण्यासासाठी शासनाने ही वृक्ष लागवडीची चळवळ जोमाने सुरू केली आहे. चळवळीत सहभाग घ्यावा, असे आवाहन वन विभागाचे वनरक्षक सुभाष आढागळे यांनी केले. गावात नूसते झाडे लावायची नाही तर त्याचे संवर्धन करायचे आहे. याची जबाबदारी तुम्ही आम्ही उचलयाची त्यासाठी शाससनाच्या वृक्ष लागवडी मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद शाळेचे मुख्यापक संतोष दळे यांनी केले. येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यीनी स्वागत गीत व पर्यावरण गीत सादर केल. कार्यक्रमाचे स्वागत सूत्रसंचालन किसन कानवडे तर आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय कडलग यांनी मानले.