Breaking News

श्रीरामपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


श्रीरामपूर (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी आई, वडील व शिक्षक यांच्या सल्लानेच नवीन मार्ग निवडावा हे करत असताना आपल्यातील आत्मविश्‍वासही महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. शहरातील श्रीमंत अष्टविनायक बहुउदेशिय प्रतिष्ठाणच्यवतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभ प्रसंगी पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे बोलत होते. 
यावेळी तहसिलदार संगिता दरेकर, डॉ.श्रीकांत भालेराव, उमेश तांबडे, कपिल लोंढे, प्राध्यापक ज्ञानेश्‍वर गांगरे, अनिल पांडे, सुरेश डोखे, विक्रीकर आयुक्त सिध्दार्थ मोरे, रामपाल पांडे, दिपक बोरसे, अ‍ॅड. वाय. के. शेख, युवराज डोखे, अध्यक्ष विशाल त्रिभुवन, उपाध्यक्ष सावन परदेशी, 
सचिव पंकज कनगरे आदिसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सर्वसामान्य घरातील मुलगी तहसिलदार संगिता दरेकर हिने आपल्या जिवनातील प्रसंग सांगितले. आपण कसे घडलो ते सांगितले. आपण गरिबेमुळे दहावीनंतर शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका खाजगी दवाखान्यात कामही पाहिले. मात्र त्यावेळी शेजारधर्म काय असतो यांची आपणास प्रचिती आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सोमनाथ सुर्यवंशी, बाळु गोर्डे, सतिष भालेराव, सचिन यादव, किसन ताकते, भाग्येश लोखंडे, संदिप भोसले, गणेश वाकचौरे , अनिल पंगारे, राहुल कुलकर्णी, संतोष भालेराव, राजेंद्र राऊत, शुभम गिरी, आकाश ताकते, शुभम बिहाणी, सुरेश वाघ, महेश तांबडे, मयुर सोनार, प्रितम जेठले, रामनरेश मोर्या, बाळु कासलीवाल, देवा गायकवाड आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक युवराज डोखे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत रामपाल पांडे यांनी केले. सुत्रसंचलन शिरिष सुर्यवंशी व अजय धाकतोंडे यांनी केले. आभार अध्यक्ष विशाल त्रिभुवन यांनी मानले.