Breaking News

स्लीपर-शॉर्ट्स घातल्यामुळे पुण्याच्या 'या' हॉटेलमधून काढलं बाहेर


पुणे, 11 जुलै : 'पुणे तिथे काय ऊणे' ही म्हण पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कारण आहे पुण्याच्या स्पष्ट आणि ठळकपणे मुद्दे मांडणाऱ्या पाट्या. अहो, हे पुणेकर इतके भयंकर आहेत की त्यांनी चक्क स्लीपर आणि शॉर्ट्स घातल्यामुळे एका एजंटला हॉटेलच्या बाहेर हकलून दिलं.

ते झालं असं की, पुण्यात एका आयटी कंपनीत कामाला असणारे काही संगणक अभियंते सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवर्समधील 'एजंट जॅक' या हॉटेलात जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी पायामध्ये स्लीपर आणि अंगात शॉर्ट्स घातल्याचे कारण पुढे करून सर्वजणांना हॉटेल व्यवस्थापनाने चक्क प्रवेश नाकारला आणि त्यांना हॉटेलच्या बाहेर काढण्यात आलं.