नागपूर, 11 जुलैः नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. नाणार प्रकल्पावरून झालेल्या गोंधळात सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराने राजदंडपळवण्याची अभूतपूर्व घटनाही आज विधानसभेत घडली. हा गोंधळ होत असतानाच त्यात काँग्रेसचे आमदार नितेश राणेही सहभागी झाले. आमदारांनी राजदंड खाली नेल्यावर चोपदारांनी या आमदारांकडून राजदंड काडून घेण्यात यश मिळवलं. वाढत जाणाऱ्या गोंधळात कामकाज करणं शक्य नसल्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. सध्या संभाजी भिडे यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी आमदार आक्रमक झाले असून नाणार प्रकल्पावर आमजार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राजदंड पळवून नेला. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानपरिषदेत गोंधळ घालून परिषद बंद करायला भाग पाडलं.