Breaking News

धाडसी सैनिकाचा नागरपालिकेने केला सत्कार


कोपरगाव श. प्रतिनिधी :

काश्मिरच्या सांबा सीमेवर गेल्या १८ वर्षांपासून सीमा सुरक्षादलात विविध कामगिरी बजावणारे सैनिक राजेंद्र जगताप यांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल नगरपालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती जनार्धन कदम यांच्या हस्ते मेजर जगताप यांचा सत्कार करण्यात आला. 

नी दि. २३ मे रोजी पाकिस्तानचे २ बंकर आणि १ इम्रान पोस्ट नेस्तनाबूत केली होती. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या तुफान हल्यात राजेंद्र जगताप हे जखमी झाले होते. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल सरकारकडून त्यांना विशेष बक्षीसही जाहीर झाले. उपचारानंतर ते सुखरूप गावी निमगाव निघोज [ता. राहता] यथे आले असता सैनिक जगताप यांची नगरपालिकेच्या बांधकाम समितीचे सभापति जनार्धन कदम यांनी भेट घेतली. यावेळी जगताप यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र जगताप यांनी कोपरगाव येथील सदगुरु गंगागीर महाराज कॉलेज येथे शिक्षण घेतले आहे. दरम्यान सत्कार सोहळ्याप्रसंगी निमगावचे सरपंच कातोरे, सतिश डेंगळे, विवेक जोशी, राजेंद्र कोठारी, गंगवाल, प्रताप जोशी आदी उपस्थित होते.