Breaking News

आधारवेल फाउंडेशनचा वर्धापनदिन उत्साहात


राहुरी प्रतिनिधी

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या आधारवेल फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. पी. विश्वनाथा यांनी समाजातील वंचित, दुर्बल व निराधार घटकाच्या विकासासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधारवेल फाउंडेशन करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. प्रारंभी आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली नान्नोर यांनी प्रास्ताविक केले. 

याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी डाॅ. गिरीष बदोले, मांचिहिल शिक्षण संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, तहसिलदार अनिल दौंडे, शिवशाहीर विजय तनपुरे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, गटविकास अधिकारी परदेशी व रामदास माने, एस. एम. खेमनर, रासपच्या श्रध्दा भातांब्रेकर, डॉ. उज्वला हाके आदींची भाषणे झाली. याप्रसंगी गरजूंना आधारवेलच्यावतीने विमा पाॅलिसीचे मोफत वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास तनपुरे सहकारी कारखान्याचे कार्यकारी अधिकारी टी. आर. ढोणे, मुख्याधिकारी नानासाहब महानवार, राहुरी पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर, इंजिनिअर डी. आर. शेंडगे, सुरसिंग पवार, ग्रामसेवक अशोक कडनर, मार्केट कमिटीचे मधुकर पवार, भाजपचे नानासाहेब गागरे, राजेंद्र ढोकणे, पत्रकार विनित धसाळ, अशोक मंडलिक, शिवाजी तनपुरे, अप्पासाहेब ढूस, प्रभाकर बरे, दादा तमनर, दत्ता खेडेकर, पोपट शेंडगे, संजय कुदनर, उत्तम कुदनर, मल्हारी सोन्नर, बाळासाहेब माने, सरपंच अरुण पवार, जब्बार पठाण, विलास गागरे, संदीप बरे, दत्ता लेंभे, अप्पासाहेब बाचकर, अविनाश बाचकर आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारदे यांनी आभार मानले.