Breaking News

‘प्रवरा’च्या निकालाचा आलेख उंचावला : डॉ. राव


प्रवरानगर : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठामार्फत मे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. यावर्षी निकालाचा आलेख आणखी उंचावला, अशी माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ९२. ८६ टक्के, द्वितीय वर्षाचा निकाल ९२.५४ टक्के, तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के, चतुर्थ वर्षाचा निकाल ८९. ७१ टक्के आणि पदुत्तर प्रथम वर्षाचा निकालही १०० टक्के लागला. यामध्ये श्रद्धा काशिद, अक्षय कुदळे, स्नेहल राहटे, स्नेहल राहटे, वैष्णवी वाघ, चैताली काळे, कांचन जंगम आदी विद्यार्थिनिंनी बाजी मारली. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदींसह सर्वच शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.