Breaking News

विज पडुन युवकाचा मृत्यु



विज पडुन एका युवकाचा मृत्यु तर एक महीला गंभीर असल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना आज दुपारी २ च्या सुमारास तुमसर तालुक्यातील चिखला या ठिकाणी घडली आहे. त्यात विज पडुन मृत पावलेल्या युवकाचे नाव शैलेश पटले(१९) हे असुन; विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या महीलेचे नाव इंदिरा कोडापे(३५) असे आहे. तुमसर तालुक्यखला या गावातील रहीवासी चंदन झोडे यांच्याकडे विहीर खोदकामाचे काम सुरु होते. नित्य प्रमाणे मृतक शैलेश व इतर मजुर विहीर खोदकाम करत होते. दरम्यान वादळी पावसाची सुरुवात होवुन काम थांबविन्यात आले होते. मात्र आभाळात विजा कळाडुन उठल्या व नेमक्या कामाच्या ठिकाणावरच विज पडली. त्यात शैलेश हा जागीच मृत पावला तर इंदिरा ही गंभीर जखमी झाली. सदर घटनेची माहीती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली असुन शव विच्छेदनाकरीता मृतकाला तुमसर शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेत जखमी झालेल्या महीलेला अतिदक्ष उपचाराकरीता भंडारा येथे हलविन्यात आल्याची माहीती मीळाली आहे. मात्र डाॅक्टरांच्या मते घटनेत बचावलेल्या महीलेला शारीरीक ईजेपेक्षा घटनेचा जबर हादरा बसल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असतांना तालुक्यात नैसर्गिक विज पडण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यात पावसादरम्यान कामानिमित्त बाहेर पडणा-यांनी प्राथमिक दक्षता घेणे गरजेचे दिसुन येत आहे.