Breaking News

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये


गेली अनेक दिवसांपासून देशातील आसाम , तेलंगाणा सह आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळ्या गावात आल्या आहेत अशी अफवा वाॅटस् अपवरून पसरवून गावात येणाऱ्या नवीन व्यक्ती, वाटसरूं,वेडसर लोकांना त्याचबरोबर आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना सादर करुन गावोगावी फिरून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या कलाकारांना पकडून जमावाने अमानुषपणे मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मारहाण केल्यामुळे यात निष्पाप लोकांचा मृत्यू ओढवल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस अधिक्षक कार्यालय,गडचिरोली यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की,नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत व अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.अशा प्रकारची कोणतीही टोळी गडचिरोली मध्ये सक्रिय नसून असा कोणताही प्रकार किंवा घटना जिल्ह्यात घडलेली नाही.आपल्या गावात येणाऱ्या अनोळखी इसमाबाबत आपल्या मनात काही संशय असल्यास कायदा हातात न घेता आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा नियंत्रण कक्षाशी 07132-222142 07132-222163 संपर्क साधावा. अशा प्रकारें कायदा हातात घेउन मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. मारहाणीत मृत्यु झाल्यास संपूर्ण जमावावर कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल.