Breaking News

सेवानिवृत्तीबद्दल शेळके यांचा सत्कार


सुपा | प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील श्री. भैरवनाथ विद्यालयातील सेवाज्येष्ठ शिक्षक तात्या शेळके यांच्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती निमित्त विद्यालयात शिक्षक विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र गोरे होते. एकाच विद्यालयात अखंड ३५ वर्षे सेवा झाल्याने त्यांनी ऋण व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शेळके यांचे आरोग्य उत्तम राहाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षक शेळके यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मिष्टान्न भोजन दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तात्या शेळके यांचा इतिहास भुगोल विषय असल्याने विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्राचा गोडवा निर्माण करण्यात त्यांचा लौकिक होता. 

यावेळी विद्यार्थी शिक्षक यांची यावेळी शुभेच्छापर भाषणे झाली. शाळेच्या गितमंच्याने स्वागतगीत सादर केले. सुत्रसंचालन पोपट जाधव यांनी केले. उषा औटी यांनी आभार मानले.