Breaking News

चोरीचा मोबाईलने मिळाली सक्तमजुरीवर!



कोल्हार प्रतिनिधी :

लोणी येथीलपी एम टी कॅम्पस मध्येएक तरुणी मोबाईलवर संभाषण करीत असताना एका चोरट्याने तिच्या कानाजवळून मोबाईल ओढून नेला. सदर मोबाईलचा सुगावा लोणी पोलिसांनी एक दिवसात लावत आरोपीस जेरबंद केले आणि त्याला न्यायालयाने १ वर्षांची सक्तमजुरी सुनावली. सदर किस्सा हा लोणीमध्ये घडला.

योगेश रामदास विटणोर {रा. कुराणपूर ता. श्रीरामपूर} असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणी पोलिसात दाखल फिर्यादीनुसार राहता तालुक्यातील लोणी येथे दिव्या मनोज गायतोंडे महिलेच्या कानाजवळून ६० हजार रुपये किमतीचा आयफोन ओढून नेला. आरोपी कडून चोरून नेलेला ६० हजार रुपये किमतीचा आयफोन ताब्यात घेतला. त्याचे विरोधात सबळ पुरावा असल्याने न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पो. ना. मधुसूदन दहिफळे, पो. हे कॉ. सोमासे यांनी तपास केला. सदर गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे ए. ए. रंगरेज यांनी काम पाहिले.