Breaking News

काविळीने घेतला तरूणाचा बळी,


जामखेड / ता. प्रतिनिधी 
तालुक्यातील नान्नज गावचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. बाबासाहेब पवार यांचे नातू व मार्केट कमिटीचे संचालक व पंचायत समितिचे माजी सभापती तुषार पवार यांचे भाचे किरण आत्माराम सोले वय 36 यांचे अल्पशा आजाराने दि. 5 जुलै रोजी पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या वर नान्नज तालुका जामखेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते श्रीगोंदा तालुक्याचे आ. राहुल जगताप यांचे मेहुणे तर, वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. आत्माराम सोले यांचे एकमेव चिरंजीव होते. महिन्यापूर्वी कावीळ झाल्याने त्यांना प्रथम नगर व नंतर पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच काल पहाटे 5 वाजेच्या दरम्यान त्यांचे दु:खद निधन झाले. माहिती समजताच नान्नजमध्ये व्यवहार व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंदही पाळण्यात आला. दु. 3 वाजता त्यांचे पार्थिव पुण्यावरून नान्नजला आले असता, अत्यंदरर्शनासाठी एकच गर्दी झाली होती, त्यानंतर काही वेळात त्यांच्या शेतात सर्वांच्या उपस्थित शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, बहीनी, पत्नी, दोन मुली, व एक सहा महिन्याचा मुलगा असा परिवार असुन त्यांच्या निधनाने नान्नज गावासह तालुक्यात शोककळा पसरली. यावेळी बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, माजी जि. प. सदस्य मधुकर आबा राळेभात, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता वारे, नगरसेवक पवनराजे राळेभात, अमित जाधव, आय काँग्रेसचे ता. अध्यक्ष सुधीर राळेभात, राजेंद्र गुंड, राजेंद्र कोठारी यांच्यासह नान्नजसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.