Breaking News

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


अहमदनगर / प्रतिनिधी 
महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांचेकडून मिळालेल्या सुचनेनुसार अहमदनगर शहरामध्ये संबंधित एचआयव्ही क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांच्या मदतीने आणि उपलब्ध आयसीटीसी, एआरटीमधील आकडेवारीचे विश्‍लेषन करून मायक्रोप्लॅन बनविण्यात आले आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फात महानगरपालिका हद्दीत एड्सबाबतीत जनजागृती, एचआयव्ही तपासणी व पुढील उपचार देण्याचे उद्दीष्ट ठेवून शहरी भागात क्लस्टर धोरण राबविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सदर शिबिरामध्ये एचआयव्ही, क्षयरोग, तंबाखू नियंत्रण याबाबत समुपदेशन, तपासणी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तरी या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रूग्णालय अहमदनगर यांनी केले आहे.