Breaking News

श्री विठ्ठल आश्रमातील दिंडीचे नेवासाफाटा येथे स्वागत


नेवासाफाटा(प्रतिनिधी)  
गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर(जाखमाथा) येथील श्री विठ्ठल आश्रम परिवारातील दिंडीचे शुक्रवारी दि.6 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होत असून शनिवार दि. 7 जुलै रोजी सदरची दिंडी नेवासा फाटा येथील संताजी चौकात दर्शनासाठी येणार असून दुपारचे भोजन (महाप्रसाद) घेण्यासाठी व विश्रांतीसाठी दिंडी येथे थांबणार आहे . भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तैलिक महासंघाचे तालुकाध्यक्ष भानसहिवरा येथील सरपंच देविदास साळुंके यांनी केले आहे.
पंढरीकडे प्रस्थान करण्यासाठी निघालेल्या या दिंडीचे नेवासाफाटा येथील नेवासा रोडवर असलेल्या संताजी महाराज चौकात स्वागत व दर्शनासाठी पालखी येणार आहे या दिंडीतील वारकर्‍यांना साळुंके परिवाराच्या वतीने भोजन (महाप्रसाद) दिला जाणार असून यानिमित्ताने प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच देविदास साळुंके व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.